Ad will apear here
Next
ग्रामीण भागातील चिमुकल्यांनी लुटला पणत्या रंगवण्याचा आनंद



डहाणू :
ग्रामीण भागातील मुलांमध्ये सुप्त कलागुण असतात; मात्र ते प्रकट व्हायला माध्यम व योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. हेच लक्षात घेऊन पेण सहयोग फाउंडेशनने पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील दाभोण पिलाणपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. पणत्या कशा रंगवाव्यात आणि कशा सजवाव्यात, याची प्रात्यक्षिके दाखवून मुलांना ते करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.


या कार्यक्रमात परिसरातील पहिली ते आठवीच्या २०० ते ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आलेल्या पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून स्वागत केले. सर्व शिक्षक आणि प्रतिनिधींमार्फत छोटे छोटे गट तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पणती, रंग, ब्रश आणि सजावटीचे साहित्य देण्यात आले. कलाशिक्षक महेश काचरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना रंगांची ओळख करून देण्यात आली. सर्व शिक्षक प्रतिनिधींच्या सहकार्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रीतीने मनमोहक रंगकाम आणि सजावट करून पणत्या रंगवण्याचा मनमुराद आनंद लुटला.




या कार्यक्रमासाठी पेण सहयोग फाउंडेशनचे संचालक योगेश सावे आणि टीम, कलाकार महाराष्ट्र उपक्रम मार्गदर्शक महेश काचरे, भावेश काचरे, दाभोण केंद्रातील शिक्षक, विद्यार्थी व पालक आवर्जून उपस्थित होते. ग्रामीण भागातील मुलांना असे कलात्मक उपक्रम साहित्यानिशी कधीच शिकायला मिळत नाहीत. ते मिळावेत, यासाठी असे कार्यक्रम विविध संस्थांनी ग्रामीण भागात आवर्जून राबविणे नितांत गरजेचे आहे, असे महेश काचरे यांनी सांगितले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZVFCF
Similar Posts
चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक दिवाळीची तयारी पुणे : बावधनमधील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच आकर्षक कंदील, तोरणे आणि रंगीत पणत्या तयार केल्या. त्यांना या कामात पालकांनीही उत्साहाने मदत केली. रंगीबेरंगी कागद, खडू, माती यांच्या साह्याने मुलांनी सुंदर आकाशकंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
रोपळे गावातील पाटील विद्यालयात आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात गुरुकुल प्रकल्पांतर्गत आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आकाशकंदील कसा बनवावा आणि तो कसा सजवावा याची प्रात्यक्षिके विद्यार्थी-विद्यार्थिनींना दाखवून ते करण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देण्यात आला
सावरकर सेवा संस्थेतर्फे ठाण्यात २८ ऑक्टोबरला ‘दिवाळी पहाट’ ठाणे : ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्थेतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’ या दिमाखदार सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language